इकिगाई ( IKIGAI )- आपल्याला निरोगी, आनंदी व दीर्घायुषी जीवन जगायचे असेल तर जाणून घ्या, जपानी रहस्य
इकिगाई ( IKIGAI ) - आपल्याला निरोगी, आनंदी व दीर्घायुषी जीवन जगायचे असेल तर जाणून घ्या, जपानी रहस्य
मी या पृथ्वीतलावर का बरे आलो असेल? माझा जगण्याच्या नक्की उद्धेश काय आहे? असा प्रश्न तुम्ही
कधी स्वत:ला विचारला आहे का? नाही ना? तर आता
विचारा! रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्याला
वैतागून कितीतरी वेळा आपण असा विचार करतो कि, दूर
एकांतात कुठेतरी निघून जावे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन जीवनाचा आनंद घ्यावा. पण
हा आनंद व निरोगी जीवन आपण एकांतात न जाता, जगू शकतो का? त्याचे उत्तर - होय असे आहे.
एका जपानी सूत्राने नक्कीच आनंद व निरोगी जीवन जगू शकतो.ते सूत्र
आहे " इकिगाई " इकीगाई (IKIGAI ) म्हणजेच निरोगी, अर्थपूर्ण, आनंदी आणि दर्जेदार जीवनाचा मूलमंत्र. इकीगाई या जपानी शब्दाचा मूळ अर्थ आहे " स्वत:च्या
अस्तित्वामागील कारण ".
एका जपानी
स्त्रीला तिचा इकिगाई कसा मिळाला हे समजण्यासाठी तिच्या जीवनात घडलेल्या एक घटना पाहू .
ती स्त्री
महापौरांची पत्नी होती. एकदा ती कोमात गेली होती व मरणार होती. तिला स्वप्नात असे दिसले की ती मेली आहे आणि ती स्वर्गात पोहोचली आहे. तिथे
ती तिच्या पूर्वजांचा आवाज ऐकते, तिच्या पूर्वज आणि तिच्या मध्ये पुढील संवाद घडतो
.
पूर्वज : तू कोण आहेस ?
ती : मी महापौरांची
पत्नी आहे.
पूर्वज : तू कोणाची पत्नी आहेस ? असे आम्ही विचारले नाही, आम्ही विचारले की तू कोण आहेस
?
ती : मी चार
मुलांची आई आहे.
पूर्वज : तू किती
मुलांची आई आहेस ? असे आम्ही विचारले नाही,
आम्ही विचारले की तू कोण आहेस ?
ती : मी एक
शिक्षिका आहे.
पूर्वज : तू काय काम करीत आहेस ? असे आम्ही विचारले नाही, आम्ही विचारले की तू कोण आहेस ?
बरेच प्रश्नोत्तर झाले. त्या स्त्रीने अनेक उत्तरे दिली, तिने तिचे नाव,
गाव सांगितले आणि इतर अनेक गोष्टी तिने सांगितल्या
पण ती कोण आहे हे सांगू शकली नाही. शेवटी त्या स्त्रीने सांगितले की," मीच आहे
जी माझ्या कुटुंबाची सर्व जबादारी घेते, माझ्या मुलांवर चांगले संस्कार बिंबवते, त्यात
मला आनंद मिळतो. " तिचे हे उत्तर स्वीकारले गेले आणि ती कोमातून बाहेर आली. काही
दिवसांनी ती पूर्ण बरी होऊन पूर्व पदावर आली.
आता तिला तिच्या जीवनाचा खरा उद्धेश सापडला
म्हणजेच तिचा इकिगाई मिळाला. त्यानंतर ती स्त्री आपल्या कुटुंबाची अधिक
काळजी घ्यायला लागली आणि मुलांना योग्य संस्कार देण्यास सक्षम ठरली. जपानी लोकांचा विश्वास आहे की प्रत्येकाच्या जन्म घेण्यामागे
काही ना काही हेतू असतो. आणि तो हेतू म्हणजेच तुमचा इकिगाई असतो.
सदर विवेचनावरून
असे कळते की प्रत्येकाला आपला इकिगाई ओळखणे आवश्यक आहे. या बध्दल अधिक माहितीसाठी
इकिगाई वरील पुस्तक वाचा.
पुस्तकाचे नाव :– “ इकीगाई
“ जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले
बेस्ट
सेलर
पुस्तक
लेखक :– हेक्टर
गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस
अनुवादक :- प्रसाद ढापरे
प्रकाशक– मायमिरर
पब्लिशिंग हाउस. किंमत– रु २८०/-
या
पुस्तकात लेखकाने जपानमधील ओकिनावा बेटावरील लोकांच्या दीर्घायुषी, निरोगी, आणि आनंदी
जीवन जगण्याचे रहस्य उलगडून दाखवले आहे. आपला इकीगाई माहित असलेली ही माणसांच्या शतायुषी आयुष्य जगणेच्या रहस्य, अवलंबिलेली जीवनशैली, घेत असलेला आहार, व्यायाम, दिनक्रम याची सखोल माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. हे पुस्तक आपल्याला आपले करियर शोधण्यास मदत करते.
जर आपल्याला आपण कोणत्या कारणासाठी/ कामासाठी जन्मलो आहोत हे जाणून घ्यायचे असेल तर
त्यासाठी स्वतःला समजणे खूप जरुरीचे आहे. जगातल्या सगळ्या महान आणि यशस्वी माणसांचे
म्हणणे आहे कि, जो पर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तो त्याच्या
आयुष्यात मोठी प्रगती करू शकत नाही.
इकिगाईचे कार्य समजण्यासाठी पुढील आकृती पहा.(Fig A) आकृतीत दाखवल्याप्रमाणे
आपला इकिगाई हा चार संकल्पनाचा
मिळून तयार होतो. तुमचा इकिगाई समजण्यासाठी आकृतीत दाखविल्याप्रमाणे चार वर्तुळे बनवा . त्यामध्ये
पुढील विवेचनानुसार आपला माहिती भरा.
1. पहिल्या वर्तुळात तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडते तसेच कोणते काम तुम्ही अत्यंत
आवडीने करू शकता, हे लिहा (“What you love?” ). उदा. कविता करणे, चित्र काढणे, एकाध विषय शिकवणे, गणिती कोडे सोडवणे, क्रिकेट खेळणे इ. इ .
2. दुसऱ्या वर्तुळात ज्या गोष्टी तुम्ही सराईतपणे करू शकता, म्हणजे अश्या गोष्टी किंवा काम ज्यात तुम्ही तज्ञ आहात / प्राविण्य मिळवले आहात - म्हणजेच अश्या गोष्टी ज्या तुम्ही आत्मविश्वासाने करू शकता. (“What are you good at?” ). उदा. तुम्ही शिकवण्यात निष्णात आहात किंवा तुम्ही वक्ता म्हणून चांगले आहात किंवा तुम्ही मैदानी खेळांमध्ये सर्वोत्तम आहात इ . इ .
3.
तिसऱ्या
वर्तुळात अश्या गोष्टी लिहायचे
आहेत की ज्या द्वारे तुम्ही पैसे , संपत्ती कमवू शकता (“What you can be paid for? ” ). तुम्ही असे लिहू शकता की; मी ब्लॉग्स लिहून व youtube विडिओ तयार करून पैसे कमवेन किंवा क्रिकेट खेळून पैसे मिळवेन. इ . इ .
4. चौथ्या वर्तुळात आपल्याला असे लिहायचे आहे की, अशी कोणती गोष्टी तुम्ही करू शकता ज्यामुळे जगाला फायदा होईल, लोकांना आनंद होईल,लोकांचे कल्याण होईल. (” What the world needs?” ) तुम्ही असे लिहू शकता की; मी समाजसेवा करेल, देशसेवा करेल किंवा मी विध्यार्थ्यांना विषय पूर्ण समजण्यासाठी मदत करेन. इ . इ .
वरील
विवेचनाप्रमाणे मी माझ्या बध्दल या वर्तुळात माहिती भरली आहे . (Fig B)
पहिला
वर्तुळ : फिजिक्सबद्धल लिहिणे व फिजिक्स
शिकवणे, मला आवडतो.
दुसरा
वर्तुळ : फिजिक्सबद्धल लिहिणे व फिजिक्स
शिकवणे, साठी मी तज्ञ आहे.
तिसरा
वर्तुळ : ब्लॉगिंग व youtube व्हिडिओ
मुळे मला पैसेही मिळतात.
चौथा
वर्तुळ : माझ्या ब्लॉग्सने व
youtube व्हिडिओने विध्यार्थ्यांना संदेश मिळतात आणि त्यामुळे विध्यार्थ्यांनाही मदत मिळते.
आता तुमच्याकडे प्रत्येकि ४ रकान्यात विविध गोष्टीची यादी तयार असेल. आता फक्त आपल्याला निरीक्षण करून प्रत्येकी २ रकान्यातील सारख्या गोष्टी (COMMAN) शोधायच्या आहेत. ( Fig C )
5. वर्तुळ
१ आणि वर्तुळ २च्या छेदनबिंदूला आवड
(Passion) असे म्हणतात, म्हणजे असे काम ज्यामध्ये तुम्ही
तज्ञही आहात आणि तुम्हाला त्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो.
उदाहरणार्थ
: मला क्रिकेट खेळायला आवडते आणि मी त्यात
तरबेज देखील आहेत तर क्रिकेट हे माझे आवड (Passion) आहे किंवा मला
फिजिक्स विषय आवडतो व मी फिजिक्समध्ये तज्ञ आहे.
6. वर्तुळ २ आणि ३ मिळून बनतो तुमचा पेशा (Profession). ज्या कामात तुम्ही तरबेज आहेत; जे काम तुम्ही आत्मविश्वासाने आणि चांगल्या प्रकारे पार पाडू शकता त्याचबरोबर त्या कामासाठी पैसे मिळू शकतात. त्या गोष्टीला पेशा (Profession)(हुद्दा ) म्हटले जाते.
उदाहरणार्थ:
जर तुम्ही एक अनुभवी आर्थिक तज्ञ असाल ज्यांनी तुमच्या उद्योगात आधीच प्रतिष्ठा आणि
व्यवसायिकांचे मोठे नेटवर्क तयार केले असेल, तर तुम्ही तुमच्या नेटवर्कचा वापर धर्मादाय
संस्था सुरू करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी करू शकता. छोट्या कंपन्यांना मोफत कोचिंग
देण्यासाठी किंवा व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासाठी
तुम्ही आर्थिक जगात तुमचे ज्ञान वापरू शकता. अशा प्रकारे, आपण असे काहीतरी करत आहात
ज्यामुळे इतरांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडतो.
फिजिक्स
विषय शिकवणे व ब्लॉग लिखाणाद्वारे आणि व्हिडिओद्वारे
फिजिक्स समजून देणे हा माझा पेशा आहे.
7. क्रमांक 3 आणि 4 च्या वर्तुळांचे छेदनबिंदूमुळे तयार होणाऱ्या भागाला व्यवसाय ( Vocation) म्हणतात, म्हणजेच जर तुम्ही बर्याच लोकांमध्ये असे काहीतरी आहे ज्यात तुम्ही चांगले आहात आणि त्यासाठी पैसे मिळवत आहेत, तर तुमच्याकडे तुमचा व्यवसाय आहे. कोणत्याही मोठ्या व्यवसायाचा पाया हा जनतेशी निगडित समस्येवर आधारित असतो. मोठेमोठे व्यावसायिक अगोदर लोकांच्या समस्या काय आहेत याचा शोध घेतात व नंतर त्या समस्येवर उपाय शोधून त्या उपायावर वर आधारित व्यवसाय सुरु करतात.
उदारणार्थ : १०- २० वर्षांपूर्वी वस्तू घरपोच येत
नव्हती Amazon ने आज पूर्ण जगाला घरच्या घरी खरेदी करण्यासाठी भाग पडले आहे .
फिजिक्स
विषयांवर ब्लॉग्स लिहून तसेच youtube व्हिडिओ पोस्ट करून आर्थिक लाभ मिळवणे हा माझा
व्यवसाय आहे.
8. 4 आणि 1 वर्तुळ मिळून बनतो, विशेष
उद्दिष्ट (Mission ). जर तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते
आणि जगाला देखील आवश्यक आहे, तर तुम्ही एक विशेष उद्दिष्ट (Mission ) असलेले
व्यक्ती आहात. जे स्वयंसेवक मिशनमध्ये सामील होऊन किंवा ज्यांना गरज आहे त्यांना मानवतावादी
सेवा देऊन जग बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उदाहरणार्थ
: अब्दुल कलाम यांचे मिशन 2020 हे भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न होते; ते भारतीय
जनतेच्या हितासाठी, भल्यासाठी झटत होते म्हणून त्यांनी ह्या स्वप्नाला विशिष्ठ
उद्देश (Mission ) हे नाव
दिले.
सन 2025 पर्यंत
100 ब्लॉग्स लिहून आणि 100 youtbe विडिओ पोस्ट करून एक लाख विध्यार्थ्यांना फिजिक्स
विषयात मार्गदर्शन करण्याचा माझा विशिष्ठ उद्धेश आहे.
वरील प्रत्येक संकल्पना खरेतर अपूर्ण आहे ते कसे
पाहू .
९. फक्त एखादे उद्दिष्ट्य ( Mission ) पूर्ण
करण्यावर जर आपले पूर्ण लक्ष असेल तर आपण आनंदी व परिपूर्ण आसू, पण आपल्या आर्थिक बाबी
बिकट होऊ शकतात
१०. जर आपण फक्त आवड (
Passion ) अनुसरण करीत राहिलो तर आपण आनंदी व समाधान राहू शकतो परंतु इतर गोष्टीत स्वतःबद्दल निरुपयोगी
भावना निर्माण होऊ शकते.
११. जर कोणी
पेशा ( Profession ) निवडला तर तो आरामदायी परिस्थितीत जगू शकतो, पण
त्याच्या मनात एक अपूर्णतेची व रिक्तपणाची भावना निर्माण होऊ शकते.
१२. व्यवसाय (Vacation) निवडणाऱ्या
व्यक्तीला नेहमी उत्साह व आत्मसंतुष्ठतेचि
अनुभव मिळतो ;पण सोबतच व्यवसायिक स्पर्धेचा तसेच अनिश्चिततेचा सामना करावा लागतो.
थोडक्यात वरीलपैकि कोणताही निर्णय हा परिपूर्ण नाही प्रत्येक निर्णयात काही
ना काही समस्या आहेतच. त्यातूनच इकिगाई या संकल्पनेचा
उदय झाला . इकिगाई ही या चारही संकल्पनेचा मध्य आहे आणि ह्यामुळेच
ती परिपूर्ण आहे.
आता आपल्याला चारही रकान्यातील एक सामायिक (common ) गोष्ट शोधायची आहे म्हणजे अशी गोष्ट/ काम जी तुमची आवड देखील आहे, त्यात तुम्ही निष्णात देखील आहात तसेच तुम्हाला त्या कामासाठी पैसे देखील मिळू शकतील त्याचप्रमाणे ते काम जगाच्या देखील उपयोगाचे आहे आणि हाच तो तुमचा इकिगाई ( IKIGAI ).
Fig D
मी ४५ वर्ष फिजिक्स विषयात अनुभव असलेल्या निवृत्त प्राध्यपक आहे. माझा इकिगाई पुढील
प्रमाणे आहे. फिजिक्सबद्धल
लिहिणे व फिजिक्स शिकवणे, मला आवडतो. तसेच माझ्या ब्लॉग्सने व youtube व्हिडिओने
लोकांना संदेश मिळतात आणि त्यामुळे लोकांनाही मदत मिळते तसेच ब्लॉगिंग व youtube व्हिडिओ
मुळे मला पैसेही मिळतात म्हणून माझ्यासाठी “ फिजिक्सबद्धल ब्लॉगिंग लिहिणे व फिजिक्सबद्धल
youtube व्हिडिओ तयार करणे
“हे माझे इकिगाई आहे. मला माझा इकिगाई मिळाल्यामुळे मी वयाच्या 71 वर्षी सुद्धा आनंदी
व निरोगी जीवन जगत आहे.
Fig E फिजिक्स सोप्या रीतीने Band Theory समजण्यासाठी
एक diagram आहे.
आपल्या
प्रत्येकाचे इकीगाई हे वेगवेगळे असले तरी आपण सर्वजण त्याच्या शोधात
आहोत. आणि प्रत्येकाने कसून आपल्या जीवनाचा हेतू शोधला पाहिजे. सदा आनंदी, हसतखेळत
जगले पाहिजे. दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदपूर्ण जीवनाचा मूलमंत्र आपल्याला या
जपानी लोकांच्या इकिगाई ( IKIGAI )
जीवनशैलीतून अनुभवायला मिळतो.
आपल्याला आपला इकीगाई सापडला की, मग त्यासाठी आपण आपले आयुष्य त्याप्रमाणे
जगायला हवे. जपानी लोकांना आराम वा निवृत्ती माहित नसते. त्यामुळेच ही माणसे अविरत
काम करताना दिसतात. जपान मध्ये म्हणच आहे की, ‘फक्त कार्यरत राहिलात तरी शतायुषी व्हाल.’ जपानी भाषेमध्ये
निवृत्तीसाठी कोणताही शब्दच नाही . ओकिनावा बेटावरील माणसे फक्त जास्त जगत नाहीत तर
दर्जेदार आयुष्य जगतात. त्यात मोठा वाटा असतो तो त्यांच्या आहाराचा. ‘हारा-हाची-बु’,
म्हणजेच तुमचे पोट फक्त ८०% भरा. अन्न सुद्धा लहान लहान प्लेट्स मध्ये
वाढले जाते, जेणेकरून कमी खाल्ले जाईल. मासे, रताळी, पालेभाज्या यांचा प्रामुख्याने
आहारात समावेश असतो. याशिवाय समूह बनवून एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती सुद्धा या
लोकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते.
जपानी लोकांच्या आनंदी आणि दीर्घ आयुष्यात मोलाची भर टाकणारा आणखी
एक घटक म्हणजे चिरतारुण्य. यासाठी जपानी लोक खालील गोष्टी करतात.
*चिंता सोडून देणे. चिंता आयुष्य कमी करते.
*रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे. चालायला जाणे.
*स्वत:ला सतत व्यस्त ठेवणे.
*सकस व मोजका आहार घेणे, वर्तमानात जगणे. मित्रांसोबत
वेळ घालवणे.
तुम्ही तुमचं इकिगाई शोधा आणि आनंदी, निरोगी व, दीर्घायुषी जीवन जगा . हीच हार्दिक शुभेच्छा .
खूप छान सर
ReplyDelete