ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत
ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत
मेंदूचा वापर:
साधारण मेंदूच्या क्षमतेच्या २% वापर होतो.नोबेल मिळविणाऱ्या शास्त्रज्ञ २०- २५ % मेंदूच्या क्षमतेचा वापर करतात. लिओनार्डो विंची यांनी साधारण ६० - ६५ % मेंदूच्या क्षमतेचा वापर केला आहे .
डावा व उजवा मेंदू:
मेंदूच्या डाव्या भागात भाषा, विचार, गणित, तर्क यांची केंद्रे आहेत. धोरण ठरवण्याचं काम डाव्या मेंदूचे. हा वस्तुनिष्ठ विचार, एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतो. विज्ञानाचे काम या क्षेत्राकडे सोपवलेले आहे.
उजव्या भागात भावना,
कला, सृजनशीलता यांची केंद्रे आहेत. उजव्या मेंदूला कल्पनाविलास आवडतो,
धाडस करणं हे या मेंदूचं काम असतं.
चित्र आणि वेगवेगळ्या कला हे उजव्या मेंदूचे महत्वाचे माध्यम आहे.
नाकपुडीद्वारे श्वास:
कोणत्याही क्षणी आपण एका प्रबळ नाकपुडीद्वारे
श्वास घेत असतो; नंतर काही वेळाने आपण दुसरीकडे स्विच होतो. हा स्विच
दर 2 - 2.5
तासांनी होतो आणि लयबद्ध पद्धतीने चालू राहतो.
जर आपली डावी
नाकपुडी अधिक स्पष्ट असेल तर आपल्या मेंदूची उजवी बाजू चांगली कार्य करीत आहे. आपल्या
मेंदूची उजवी बाजू मेंदूचा अधिक सर्जनशील आणिकलात्मक भाग आहे.
जेव्हा आपली उजवी नाकपुडी अधिक
स्पष्ट असेल तेव्हा आपल्या मेंदूची डावी बाजू, जी मनाचा शैक्षणिक / तर्कशास्त्र
भाग आहे, त्या क्षणी अधिक चांगले कार्य करीत आहे.
अभ्यास:
बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की ते दररोज तासनतास अभ्यास करतात पण ऐन वेळी
त्यांना काहीही आठवत नाही. अव्वल विद्यार्थी जास्त वेळ अभ्यास सुद्धा करीत नाही तरी
प्रत्येक परीक्षेत ते प्रथम येतात. या मागे कारण आहे की परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी
कठीण परिश्रम न करता हुशारीने अभ्यास करतात.
अभ्यास भाग १:
अभ्यास सुरू करण्यापूर्वी सध्या कोणती
नाकपुडी कार्यरत आहे म्हणजेच श्वास घेणे प्रबल आहे हे तपासा.
१. डाव्या नाकपुडीवर प्रभुत्व असल्यास उजवा मेंदू अधिक सक्रिय असतो. म्हणून सर्जनशील (Creative) आणि कलात्मक (Artistic) विषयांचा अभ्यास करा.
२. जर उजवी नाकपुडी प्रबल असेल तर डावा मेंदू अधिक सक्रिय असेल. तार्किक (Logical) विषयांचा अभ्यास करा.
ऊर्जेचे नियम:
भौतिकशास्त्र उर्जेच्या नियमांनुसार एका प्रकारच्या उर्जे मधून दुसर्या प्रकारच्या
उर्जे मध्ये हस्तांतरण होते. संपूर्ण विश्वामध्ये ऊर्जेची देवाण
घेवाण मधूनच अनेक क्रिया घडत आहेत . शारीरिक , भावनिक , मानसिक अश्या सर्व पातळीवर
सुद्धा ऊर्जेची देवाण घेवाण मधूनच क्रिया
घडत आहेत.
तसेच दुसऱ्या नियमानुसार एन्ट्रॉपी तापमानास प्रमाणित आहे.एंट्रोपी म्हणजे अस्वस्थपणा, अशांतता, गोंधळ
यांचे प्रमाण.
हे सूचित करते की अस्वस्थपणा वाढविण्यासाठी अधिक ऊर्जा वापरली जाते. जास्त
अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी कमी ऊर्जा उपलब्ध, कमी अस्वस्थपणा म्हणजे वापरासाठी
जास्त ऊर्जा उपलब्ध.
अभ्यास भाग 2:
1. जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा मेंदूला अधिक
ऊर्जा आवश्यक असते.
2. दिवसभर, आपण बर्याच उपक्रमांमध्ये ऊर्जा
खर्च करत असतो.
3. सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे.
सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोन्हीही
अतिशय ताजेतवाने असतात.
4. सहसा आपण संध्याकाळी किंवा रात्री उशिरा
अभ्यास सुरू करतो. परंतु कमी ऊर्जा उपलब्ध आहे म्हणून अभ्यास योग्य होणार नाही.
5. दिवसभर अनावश्यक काम व हालचाली कमी करून
ऊर्जा साठवता येतो.
ही
ऊर्जा मेंदूला अभ्यासासाठी वापर करता येईल.
6. हे ध्यानाद्वारे शक्य आहे.
ध्यान:
ध्यान साधनेचे अनेक रीत
आहेत. यापैकी एक प्रकार खाली दिल्या प्रमाणे:
1. एकाद्या शांत आणि
आरामदायी जागेवर चित्रात दाखविल्याप्रमाणे बसावे.
2. शरीराच्या कोणत्याही
भागावर ताण नसावा. डोळे बंद करा.
3. दोनतीन वेळा खोल
श्वास घेऊन हळूहळू सोडा. त्या बरोबर सर्व शरीर व मन सैल सोडा.
4. हळूहळू मन शांत करा.
त्यानंतर श्वासाकडे लक्ष्य द्या. लयबद्ध रीतीने चालू असलेल्या श्वास गतीमध्ये गुंतून
मनातील विचारांचे काहूर कमी होईल.
5. अश्या अवस्थेत किमान
१० मिनिटे बसल्यावर ध्यान साधना पूर्णत्वाकडे पोहचेल.
सुरुवातीला योग्य प्रशिक्षित व्यक्तीकडून मार्गदर्शनेने सुरुवात करावी.
ध्यानाचे महत्व समजण्यासाठी YOUTUBE वरील पुढील व्हिडिओ पहा .
स्मृती Memory:
व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, मिळालेली
माहिती, ज्ञान यांसारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्या आठवून
(त्यांना बाहेर काढून) जाणिवेच्या अवस्थेत त्यांचा पुन्हा अनुभव घेण्याची वा वापर
करण्याची क्षमता म्हणजेच स्मृती
(Memory ) होय.
एखाद्या
व्यक्तीच्या अल्प किंवा दीर्घकालीन स्मृतीमध्ये आधीच संग्रहित केलेल्या माहिती गमावणे (To Lose) किंवा बदल
(To Change) होणे म्हणजे विसरणे (Forget) (लक्षात
न रहाणे). ही एक
उत्स्फूर्त तसेच हळूहळू प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्मृतीमधील माहिती
परत आणता येत नाहीत.
विसरण्याच्या संशोधनातून असे दिसून आले आहे
की
1.शिकणारे सरासरी 50% नवीन माहिती एक तासाच्या आत
विसरतात.
2.शिकणारे सरासरी 70% नवीन माहिती 24
तासांच्या आत विसरतात.
3.शिकणारे शिकलेले 90% पर्यंत नवीन माहिती एका आठवड्याच्या आत विसरतात.
शिकलेले स्मृतीत साठवणे:
शिकलेले
नवीन माहिती स्मृतीत साठवणे ही एखाद्या व्यक्तीची त्यांच्या दीर्घकालीन
स्मृतीमध्ये हस्तांतरित करण्याची क्षमता आहे ज्यामुळे त्यांना ते ज्ञान
लक्षात ठेवणे आणि भविष्यात वापरण्यासाठी स्मृतीत ठेवणे सोपे होईल.
संशोधन असे दर्शवितो की लोक लक्षात
ठेवतात:
1. लोक शिकलेले नवीन माहिती 10% लक्षात ठेवतात ते जे ऐकतात,
2. लोक शिकलेले नवीन माहिती 20% लक्षात ठेवतात ते जे वाचतात,
3. लोक शिकलेले नवीन माहिती 80% लक्षात ठेवतात ते जे पाहतात.
आणि याचे कारण असे की मानवी मेंदू लिखित भाषेपेक्षा दृश्य पुरावांवर अधिक चांगल्या
प्रकारे प्रक्रिया करतो.
माहिती टिकवून ठेवण्यासाठी आणि आठवणे आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पुढील YOUTUBE व्हिडिओ पहा.
स्मृतीची क्षमता वाढवण्यासाठी पुढे दिलेल्या काही
सोप्या पद्धती :
१. आपण A पासून Z पर्यंत अक्षरे म्हणतो. त्या ऐवजी Z पासून A पर्यंत अक्षरे म्हणण्याचे सराव करा.
२. आपल्याला आवडलेल्या गाण्यातील शब्दातील अक्षरे उलट करून गाणे आहे
तसे म्हणणे.
३. वाचताना तोंडाने हळू आवाजामध्ये पुटपुटणे. खात्रीने
४. आपण वाचलेली माहिती दुसऱ्याला समजावून
सांगणे.
५. ३० पर्यंतचे पाढे
पाठ करा.
सारांश:
तुम्हाला आता वाचलेले लक्षात कसे ठेवावे आणि
वाचलेले लक्षात राहण्यासाठी उपाय हे माहित झाले आहेत.
1. थोडक्यात अभ्यास सुरु करताना प्रथम
ध्यानाने सुरु करावी.
2. नंतर सध्या कोणती नाकपुडी कार्यरत आहे म्हणजेच
श्वास घेणे प्रबल आहे हे तपासा व वर सांगितल्या प्रमाणे विषयाची निवड
करून अभ्यास करावा.
3. अभ्यासामध्ये सातत्य ठेवावा.
या सर्व गोष्टीच्या मदतीने तुम्ही अभ्यासामध्ये
प्रगती करून धवधवीत यश मिळवावी. ही सदिच्छा
व्यक्त करतो.
सौजन्य: Google search,
Youtube
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
ReplyDeleteEnlightening information..
ReplyDelete