जीवनशैली - सुयोग्य व सहज : नेहमी व करोनासारख्या महामारीमध्ये सुध्दा आपले आरोग्य नीटनेटके राहण्यासाठी योग्य राजमार्ग.
जीवनशैली - सुयोग्य व सहज: नेहमी व करोनासारख्या महामारीमध्ये सुध्दा आपले आरोग्य नीटनेटके राहण्यासाठी योग्य राजमार्ग.
प्रस्तावना:
डॉ. ह.वि. सरदेसाई:
डॉ. हणमंत विद्याधर सरदेसाई (जन्म: १० एप्रिल १९३३,
मृत्यू :१५ मार्च २०२०) हे डॉक्टर व लेखक होते. ते सातत्याने वृत्तपत्रांतून आरोग्यविषयीचे
लेख लिहीत. ते पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजात प्राध्यापक होते. न्यूरोलोजी विषयात
एमडी करून ते पुण्यात स्थाईक झाले. वैद्यकीय विषयाशी निगडित पुण्यातील अनेक संस्थांचे
ते अध्यक्ष, सदस्य होते. त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारे
“निरामय जीवनाचे पथदर्शक-डॉ. ह.वि. सरदेसाई” हे पुस्तक तसेच इतर अनेक आरोग्यविषयक पुस्तके प्रकाशित
झालेली आहेत.डॉ.ह.वि.सरदेसाई हे श्रेष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ असून सोप्या भाषेत वैद्यकीय
ज्ञानाचा प्रसार करणारे लेखक होते. वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत पोहोचविण्यासाठी त्यांनी
विपुल लेखन केले. “घरोघरी ज्ञानेश्वर
जन्मती” हे त्यांचे पुस्तक
गाजले. लोकांनी त्यांना दिलेली ‘धन्वंतरी’ ही उपाधी त्यांनी सार्थ केली.
आजच्या काळातील जीवनशैली:
जीवनशैली म्हणजे आपले जीवन जगण्याची पद्धत. या
पद्धतीचा विचार करताना माणसाचे आचार, विचार, आहार आणि व्यवहार ध्यानात घेतले जातात.
विचार, आहार, व्यायाम, आणि वागणे म्हणजे
जीवनक्रम होय. असा जीवनक्रम सर्वांचा सर्व काळ सारखा राहू शकत नाही. आजच्या काळात डॉक्टरांकडे
जाणाऱ्या रुग्णाच्या तक्रारींपैकी ८५ % तक्रारींचे मूळ सदोष जीवनशैली आहे. शारीरिक
श्रम आणि व्यायाम कमी झाले आहे. आहारात दोष निर्माण होऊ लागले आहेत. कारण सदोष जीवनशैली
अनुसरली जात आहे. यात बदल हवा असल्यास प्रथम मेंदूचे कार्य समजून घ्यावे लागेल.
मेंदूचे कार्य:
मन सर्व
निर्णयांचे केंद्र आहे. यासाठी अनुभव, सारासार विचार यांची गरज असते. मनाचा
शरीरावर मोठा परिणाम होत असतो. मनोशारीरिक व्यवहार एका नाण्याचा दोन बाजू आहेत.
अनेक शारीरिक त्रासाचं मूळ मनात असते. जीवनात केव्हाही प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे
काढणे या दोन्ही घटना आपल्या मेंदूतच होतात. त्याचप्रमाणे उत्तर सापडेपर्यंत येणारा
तणाव आणि उत्तर माहित असल्याचा आनंदही मेंदूत होत असतो. संवेदना, ओळख, स्मृती, भावना,
विचार, उहापोह, निर्णय आणि कार्यवाही या कार्याशी मेंदूच्या आवरणातील पेशींचा सर्वात
निकटचा संबंध आहे. या भागाला न्यूओकार्टेक्स म्हटले जाते. मानवी बुद्धिमत्ता बऱ्याच
अंशी या न्यूओकार्टेक्सवर अवलंबून असते.
समस्यांचे
उकल करण्याचा मेंदूतील पेशींना निओकॉर्टेक्स (Neocortex) असे म्हणतात. निओकोर्टेक्स हे
मेंदूच्या उच्च कार्ये, जसे की समज, निर्णय घेण्याची क्षमता आणि भाषा यांचे केंद्र
आहे. जन्मताना निओकॉर्टेक्स पेशींची
ठराविक संख्या घेऊन आपण जन्मत असतो, यांचा पुर्ननिर्माण होत नाही, जितकी संख्या जास्त तितक्या लवकर समस्यांचे उकल. पण सदोष जीवनशैलीमुळे संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे प्रश्नांचे उत्तर मिळणे अवघड होत जाईल व ताण निर्माण होईल. नेओकार्टेक्सचे
काम उत्तम रीतीने चालू असेल तर प्रश्नाचे उत्तर लवकर सापडते व त्यामुळे तणाव
निर्माण होत नाही. शांत व प्रसन्न मनात बुद्धी चांगली राहते.
प्रकृती चांगली
राखायची असते हे लोकांना माहिती असतं. पण ती कशी चांगली राखायची, याचं मात्र ज्ञान
त्यांना नसतं. गैरसमजातून बराच त्रास होतो. त्यामुळे समाजाला ज्ञानवंत करण्याची
गरज आहे. प्रकृती चांगली राखायची असेल तर सकस आणि संतुलित आहार, व्यायाम आणि मनाचं
आरोग्य ही तीन सूत्रं फार महत्त्वाची आहेत. यासाठी निओकॉर्टेक्स पेशींची संख्या सांभाळून ठेवणे आवश्यक आहे.
डॉ ह वि
सरदेसाई यांनी निओकॉर्टेक्स पेशींची संख्या शाबूत ठेवण्यासाठी सुयोग्य जीवनशैली कशी असावी यासाठी
आठ चरणांचे सूत्र सांगितला आहे. हे चरण इंग्लिश वर्णमालेतील पहिले ८ अक्षरे ABCDEFGH मध्ये बांधले गेले आहेत. ते पुढील प्रमाणे
आहेत.
1. A for
Anxiety - चिंता, तणाव, काळजी:
आजच्या जगात माणसाची प्रकृती बिघडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तणाव. डॉक्टरकडे जाणारे सुमारे ८५ % रुग्ण हे मनोकायिक विकाराने ग्रस्त असतात. तणाव सर्वाना असतो. काही प्रमाणात तणाव असणे, हे हितकारक असते. कारण त्यामुळे त्या व्यक्तीत असणारे सुप्त गुण जागृत होऊ लागतात. त्याउलट तणावाचा अतिरेक झाला तर तो अपायकारक ठरतो. कारण त्या तणावाचा परिणाम शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक अश्या सर्व स्तरांवर दिसून येतो. अश्या तणावाचा परिणाम निओकॉर्टेक्स पेशींची संख्या कमी करण्यात होतो.
आपल्यापुढे कोणत्याही प्रश्न पडला की त्या प्रश्नाचे
उत्तर काढण्याचा आपले मन लगेच प्रयत्न करू लागते. योग्य उत्तर सापडेपर्यंत मनाची अवस्था
तणावयुक्त असते. एकदा उत्तर सापडले की तणाव नाहीसा होतो. प्रश्न पडण्यापूर्वीच उत्तर
माहित असले तर आनंद मिळतो, तणाव नाहीसा होतो. समजा परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नाची
तयारी आपण आदल्या दिवशीच केलेली असेल तर, उत्तर माहित असल्यामुळे आपण उत्साहित होतो.
पण तयार न केलेला प्रश्न दिसल्यावर पेपर कठीण
असल्याची जाणीव होऊन तणाव निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय प्रश्न पडण्याची
शक्यता आहे याचे अंदाज बांधून त्यांची उत्तरे तयार ठेवले तर, पडलेल्या प्रश्नाचे उत्तर
आधीच माहित असल्याचा आनंद सतत उपभोगता येईल. त्यामुळे निओकॉर्टेक्स पेशींची संख्यावर
परिणाम होत नाही.
बरेच जण नेहमी भूत किंवा भविष्य काळात वावरत असतात. पूर्वी असे असे
घडले किंवा आता पुढे असे असे होईल या प्रकारे सतत विचार करून तणाव निर्माण करत असतात.
पण वर्तमान काळात असल्यावर भूत किंवा भविष्य
काळाचा विसर पडून, माणूस आनंदित राहू शकतो. वर्तमान स्वीकारणे म्हणजे तणावमुक्त जगणे
होय.
2. B – Bottle - दारू व तत्सम पदार्थ :
3. C – Cigar -सिगारेट व तंबाकूजन्य पदार्थ :
सुखी जीवनाचा एक भाग म्हणून माणसे सिगारेट, पान - तंबाखूचे व्यसन करतात. तंबाखूमध्ये
अनेक हानिकारक रसायने आहेत. दारूप्रमाणे या पदार्थामधला विषद्रव्ये एकूणएक शरीरातील पेशींवर अपायाकर परिणाम करतात. विशेषतः निओकॉर्टेक्स पेशींवर जास्त परिणाम होतो.
त्यामुळे हे व्यसन न
करता सुखी जीवन जगावे.
4. D – Diet योग्य आहार :
आपल्या आहारात विविधता असणे हिताचे आहे. आहार हा
जीवनशैलीचा एक प्रमुख पैलू आहे. आपल्या आहातातून उष्मांक, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध
पदार्थ, जीवनसत्वे, क्षार, चोथा, पाणी आणि तृप्ती मिळावी. या करीता आहारात तृण धान्य,
डाळी, उसळी, दूध व दुधाच्या पदार्थ, तेल, जीवनसत्वासाठी कच्चे अन्न, फळे इत्यादीचा
समावेश असावा.
सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणाचे वेळ रोज ठराविक असणे
आवश्यक आहे. कारण पाचक रस त्या त्या वेळी स्रवतात व अन्न पचन चांगले होते. त्या त्या
सिझनमधील फळे खाणे गरज आहे.
5. E – Exercise - व्यायाम:
प्रकृती चांगली राहण्याकरिता अंतर्बाह्य
स्वच्छता आणि सकस आहाराइतकेच महत्वाचे आहे नियमित केलेल्या व्यायाम. त्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारचे व्यायाम आवश्यक असतात. स्थिर, चल पद्धतीचे, लवचिकता टिकविणारे, दमछाक न होता
दीर्घकाळ श्रम करण्याची क्षमता देणारे असे चार प्रकारचे व्यायाम प्रत्येकाला आवश्यक
आहेत. चालणे, पोहणे, सायकल चालवणे, सूर्यनमस्कार घालणे, योगासन, प्राणायाम अश्याप्रकाराचे व्यायाम करणे आवश्यक आहे. रोज शक्यतो सकाळी किमान अर्धातास
आणि आठवड्याला पाच दिवस व्यायाम करावा.
6. F – Friend मित्र:
आपले मन पारदर्शक असायला हवे. त्यासाठी आपल्या मनातील घटना स्वतःला आणि इतरांना
कळल्या पाहिजेत. म्हणून आपण एक सामाजिक जीवनाच्या भाग असणे आवश्यक आहे. जीवापाड प्रेम
करणारी मित्र परिवार आपल्या बरोबर नित्य नियमाने हवा. समाज्यात
अनेक व्यक्तींबरोबर सतत संबंध येत राहतो. या संबंधांना वैचारिक आणि भावनात्मक देवाणघेवाणीचे
स्वरूप असते. आपले विचार, आपल्याला व आपल्या मित्रांना समजले तरच त्यांतील चूक किंवा
बरोबर काय हे आपण जाणू शकू.
मनाविरुद्ध घडलेली घटना मनात साठविले जाऊन ताण
उत्पन्न होतो. ताण हे नेओकॉर्टेक्स पेशींवर वाईट परिणाम घडवितात हे आपण या पूर्वी पाहिले
आहेतच. असे साठविलेल्या गोष्टींचा निचरा होणे आवश्यक आहे. त्या साठी ह्या गोष्ठी मित्रांबरोबर
वाटून व्यक्त होणे गरजचे आहे. ह्यामुळे मन हलका होतो व ताण नाहीसा होतो.
इथे आपण एक बोधकथा बघू. एका खेडेगावात रोज संध्याकाळी देवळात कीर्तन
चालत असते. तीन-चार म्हाताऱ्या सासवा तिथे एका कोपऱ्यात येऊन बसत. तिकडे
बुवांचा कीर्तन सुरु झालेवर इकडे या बाया दिवसभर
घरात मनाविरुद्ध, विशेषतः सुनेमुळे, घडलेल्या गोष्ठी एकमेकींना सांगत असतात. त्यामुळे
त्यांच्या मनातील घाणीचा निचरा होऊन ते सर्व जणी आनंदाने घरी जातात. तिकडे त्यांचे
सुनां बॅडमिंटन खेळताना, प्रत्येक चेंडूंबरोबर सासू बद्धल मनात साठविलेल्या गोष्टी
मारत असतात. तेही आनंदित होऊन घरी परतल्यामुळे घरात सौख्य नांदत असतो.
7. G - God - श्रद्धा:
इथे परमेश्वराच्या संदर्भ एक अगोचर शक्तीशी निगडित आहे. जसे वर चर्चा
केल्याप्रमाणे मित्रांमुळे मनातील वाईट गोष्टींची निचरा होण्यास मदत मिळते, तसेच इथे
आपण एक श्रद्धा स्थानाच विचार करू. हे स्थान एकदा देऊळ असेल किंवा एक निवांत ठिकाण
असेल, जिथे मनात साठवलेल्या मनाविरुद्धच्या गोष्टीचा निचरा करू शकू. यामुळे मनःशांती मिळते व ताण कमी होतो.
8. H – Humor - विनोदबुद्धी:
विनोदाचा परिणाम मनावरील ताण हलका करण्यासाठी होतो. ताण तणावाला सामोरे जाताना
आपली विनोद बुद्धी साबूत ठेवली तर कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड देणे शक्य होते. एकत्रितपणे
काम करतानाही हास्याचा खूप उपयोग होतो. खूप ताण निर्माण करणारे काम करताना काहीतरी
विनोद घडतो आणि वातावरण हलकेफुलके बनते. आपोआपच ताण कमी होतो. हसण्याने मेंदूत एण्डार्फिन्स
नावाचे रासायनिक रेणू तयार होतात. यामुळे माणस उत्साही होऊन, वेदनेपासून मुक्त होतो.
आपले शरीर शिथिल होते, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते व मनात आनंद निर्माण होतो. एकूण काय हास्यविनोद करीत जगत राहिले तर मन आणि
शरीर दोन्ही स्वस्थ राहते. अनेक आजारांतून बरे होण्याकरिता याचा फायदा होतो.
ज्याचे मन प्रसन्न आहे,
त्याचीच बुद्धी स्थिर राहते. म्हणून विनोदबुद्धी जागृत ठेवा व आनंदी राहा.
इथे एक बोधकथा पाहू.
फार फार जुन्या काळातील गोष्ट आहे. मुल्लानसरुद्दिन
हा एक फार मोठा व्यापारी होता. नेहमी व्यस्थ जीवनक्रमाबरोबर तो काही छंद जोपासला होता.
त्यांनी घरात काही मांजरे पाळली होती. काम संपून घरी आल्यावर तो त्या मांजरासोबत वेळ
घालवत असे. त्यातल्या त्यात एक पांढरे मांजर त्याला जास्त आवडायचे. एकदा मुल्लानसरुद्दीनला
व्यापारानिमित्त लंडनला जाण्याची गरज होती. त्यावेळी बोटीतून बरेच दिवस प्रवास करून
लंडनला पोहचावे लागत होते. निघण्यापूर्वी तो सर्व व्यवस्था लावून, शेवटी मांजराबद्धल
बायकोकडे जबाबदारी सोपविली. बायको फक्त हो म्हणाली.
मुल्लानसरुद्दीन बोटीत जाऊन बसला व त्याला बायको
फक्त हो का म्हणाली, ती मांजरांची काळजी घेईल का ? माझा पांढरे मांजर कसा असेल असे
चिंता करत करत १०-१५ दिवसांनी तो लंडनला पोहचला. लगेच त्यांनी बायकोला फोन लावून मांजराबद्धल
विचारले. बायको म्हणाली 'तुह्मी गेला दुसऱ्या दिवशीच पांढरे मांजर मेले.’ मुल्लानसरुद्दीन
म्हणाला ' तुला माणसाचे मानसशाश्त्र माहित नाही का ? एकदम मांजर मेले असे सांगितल्यामुळे
मला फार धक्का बसला. त्या ऐवजी तु असा सांगायला पाहिजे होते की. मांजर खेळता - खेळता
छप्परावर चढले आहे. नंतर फोन केल्यावर म्हणायचं की मांजर घसरून पडला आहे, पाय मोडला
आहे, औषध - पाणी सुरु आहे पण सुधारणा नाही, त्यामुळे माझी मानसिक तयारी झाली असती.
पुढच्या वेळी सांगायचं की मांजर मेले. मला धक्का बसला नसता'
नंतर काही दिवसांनी बायकोच फोन आला , मुल्लानसरुद्दीन
विचारला 'आई कशी आहे? ' ती म्हणाली, ' त्यासाठीच तर फोन केला आहे. आई छपरावर चढली आहे.'
समारोप:
वरील प्रमाणे आठ चरणांचा जीवनशैली
आपण अंगिकारल्यावर आपले जीवन सुखी व समृद्ध होईल यात शंका नाही. या सर्वामध्ये मनाला
फार महत्व आहे. मन सर्व निर्णयांचे केंद्र आहे. यासाठी अनुभव, सारासार विचार यांची गरज असते.
मनाचा शरीरावर मोठा परिणाम होत असतो. मनोशारीरिक व्यवहार एका नाण्याचा दोन बाजू आहेत.
अनेक शारीरिक त्रासाचं मूळ मनात असते. नेओकार्टेक्सचे काम उत्तम रीतीने चालू असेल तर
प्रश्नाचे उत्तर लवकर सापडतात व त्यामुळे तणाव निर्माण होत नाही. शांत व प्रसन्न मनात
बुद्धी चांगली राहते.
मानसिक ताणातून बाहेर कसे येता येईल? | Dr. H.V. Sardesai खालील विडिओ पहा.
हास्य साखळी साठी खालील विडिओ पहा.
खूप छान माहीती.
ReplyDeleteVery useful information
ReplyDeleteThank you for sharing 🙂
Thank U
ReplyDeleteNice sharing.Thanks for best article.very scientific approach.
ReplyDeletevery well explained Sir, interesting & very useful for everyone in day to day life.
ReplyDelete