आपल्यासाठी सदैव तयार असणाऱ्या अल्लादीन चिराग मधील जीन -- अर्धजागृत मन


आपल्यासाठी सदैव तयार असणाऱ्या अल्लादीन चिराग मधील जीन -- अर्धजागृत मन

 विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रुपात प्रगट होण्या आधी तिची निर्मिती प्रथम विचार रुपात प्रगटते. मगच ती वास्तवात साकार होतात. आपल्या मनाचे ४  भाग असे आहेत --

चेतन मन, अर्ध (अव ) चेतन मन, अचेतन मन आणि अतिचेतन मन

यामुळे मनाच्या अवस्था-- 

जागृत अवस्था, ध्यान अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था अशा  तयार होतात. 

चेतन (जागृत) मन

Conscious mind

जागृत अवस्था

Waking state

अर्ध जागृत मन or

अर्ध (अव ) चेतन मन

Sub Conscious mind

ध्यान अवस्था

Meditation state

अचेतन मन

Un-Conscious mind

स्वप्नावस्था

Dream state

अतिचेतन मन 

Super Conscious mind

निद्रावस्था

Sleepiness State


याच्यातील चेतन मन, अर्ध चेतन मन यांचे विभागणी एक बाह्य मन व एक अंर्त मन या प्रमाणे होते.
 अंर्त मनात व बाह्य मनात काय फरक आहे? तो फरक म्हणजे जसं कि नदीतील खळखळते पाणी व संथ पाणी. बर्ही मनाचे कार्य नदीतील खळखळत्या पाण्याप्रमाणे दिसून येते व अंर्त मनाचे कार्य संथ पाण्याप्रमाणे शांतपणे आपले कार्य करित असते. बाह्य मन विचार आणि भावना अनुभवतं, अनुमान लावतं, कथा बनवतं आणि अशांत राहतं.

मनाचे काम कसे चालते याचे शास्त्रीय स्पष्टीकरण आता बघू. मनात विचार येताच मन मेंदूच्या मज्जातंतूमध्ये विद्युतप्रेरणेची कंपने निर्माण करते. जसे हृदयाची कंपने ECG  ने मोजतात तसे ही कंपने  EEG (Electro-Encephalo -Gram )  ने मोजतात. 

   

मनाची अवस्था

चिन्ह

विद्युत कंपन प्रमाण 

जागृत अवस्था   

बीटा

20  ते 40 Hz

ध्यान अवस्था   

अल्फा

7 ते  14 Hz

स्वप्नावस्था

थिटा

4 ते 7 Hz

निद्रावस्था 

डेल्टा 

0 ते 4 Hz


 
1  जागृत मन हे अर्ध जागृत मनाला अल्फा स्थितीत असताना आज्ञा देऊ शकतो .

      हे ध्यानामुळे प्राप्त होते.

 2 जागृत (Conscious) मन हा आपल्या मनाचा एक भाग आहे जो तर्कशास्त्र आणि युक्तिवादासाठी जबाबदार आहे.
  3 आपल्या सर्व अनैच्छिक क्रियांसाठी अवचेतन (अर्ध जागृत - Sub- Conscious  ) मन जबाबदार असते.  
   4  आपली श्वास गती आणि हृदयाचे ठोके आपल्या अर्ध जागृत मनाद्वारे नियंत्रित केले जातात.
5 आपले जागृत मन आज्ञा करते आणि आपले अर्ध जागृत मन त्याचे पालन करते.
 6  जागृत मनाची क्षमता 10% असते आणि अर्ध जागृत मनाची क्षमता 90% आहे.

जागृत मन

अर्ध जागृत मन

वैयक्तिक, स्वतंत्र असण्याची जाणीव

वैश्विक, इतर जीवांशी संबंध असल्याची जाणीव

विचारांचे   कंपन - 20  ते 40 Hz

विचारांचे   कंपन - 7 ते  14 Hz

कार्य - बौद्धिक ध्येय आखणे, त्याचे नियोजन, कृती ठरवणे

कार्य  - श्वासोच्छ्वास, पंचेंद्रियांचे कार्य शरीरातील अनैच्छिक कार्य

10 %  क्षमता, मर्यादित प्रक्रिया क्षमता 

90 %  क्षमता,मर्यादित प्रक्रिया क्षमता 

सामर्थ्य - मर्यादित ज्ञान व क्षमता 

सामर्थ्य - मर्यादित  ज्ञान व क्षमता 

तात्विक विचार प्रक्रिया

शब्दश: विचार प्रक्रिया

स्थळकाळाने बंधित , फक्त वर्तमान काळ 

स्थळकाळाने बंधित नाही ,  तिन्ही काळ

अल्पकाळाची स्मृती

  दीर्घकाळाची स्मृती

फक्त जागेपणी कार्यरत

 24 X 7  कार्यरत

 

  वैज्ञानिक सांगतात की जागृत मन एका विशिष्ट अवस्थेत शरीरात जाणिवेचं काम करत असते. तार्किक दृष्ट्या जे काही व्यक्ती करत असते त्याचा संबंध जागृत मनाशी असतो जसे की आपण रोजच्या व्यवहारात ज्या गोष्टी तर्क वापरून करतो; दोन गोष्टी तुलना करून करत असतो, त्या सर्व चेतन मनाशी जोडलेल्या असतात. जागृत मन त्यावरच कार्य करत असते. उदा. आपली दैनंदिन सर्व कामे आपण ह्या  जागृत मनाच्या आधारे सामान्य तर्कांच्या आधारे सहजरित्या करत असतो.. पण चेतन मनाचा खोलात अंतर्मन विराजमान असते त्याकडे हे सर्व दैनंदिन विषय पोहोचतातच असे नाही.

   शरीर चालवण्याचं महत्त्वाचं कार्य हे अर्ध जागृत मन करत असते. शरीराच्या सर्वच क्रिया ज्यांचावर आपला म्हणावा असा काही ताबा नसतो. ज्या क्रिया आपोआप होत असतात उदा. श्वासोच्छ्वास, रक्ता शरीरात फिरणं, इ. असे हे मन वैज्ञानिकांना जाणीवांच्या पलीकडे बऱ्याचदा वाटते म्हणून त्याला अर्ध जागृत मन म्हटले जाते.

   बहुदा सर्वसामान्य लोक जागृत मनाच्या स्तरावर जन्म घेतात ,जगतात आणि मरतात.. फारच थोडे लोक अर्ध जागृत मनाला जाणतात, त्याचा उपयोग करतात (उदा. सचिन तेंडुलकर ). पण क्वचितच असे काही लोक असतात, जे मनाचे सर्व स्तर जाणतात (उदा. संत ज्ञानेश्वर ).

   अर्ध जागृत मनाच्या स्तरावर प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या काम करणारे लोक यशस्वी दिसतात, त्यांचे जीवन प्रगतिशील दिसते. त्यांची- त्यांची आपापसात देवाणघेवाण होते. वरच्या स्तरावरच्या लोकांचा त्यांच्यावर प्रभाव असतो.

    मन, शरीर, बुद्धी यांचा एकमेकांशी सखोल संबंध असतो. माणसाच्या मनात येणा ऱ्या   प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विचारांचा प्रभाव त्याच्या शारीरिक स्वास्थ्यावर पडत असतो. विचारांमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते, कि एखाद्याने एक विचार एक मिनिट पर्यंत पकडुन ठेवण्याचा अभ्यास केला तर त्याच्या जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होते. सुरवातीला हे अशक्य वाटेल, पण हि गोष्ट योग्य प्रकारे समजल्यानंतर तुमचे विचार आणि विश्वास यांच्यात मोठे परिवर्तन घडेल.परंतु सगळं काही शक्य आहे, असा विश्वास तुमच्यात सतत जागृत व्हायला हवा.

   उदा:- साधे लोणचे किंवा चिंच यांबद्दल विचार केला तरी तोंडाला पाणी सुटतं.  हे एक आश्चर्यच नव्हे का? आपले अंर्त मन बघू शकत नाही. पण आपण त्याला जी दृश्य दाखवितो ती ते खरी मानतं. मग ती खरी असोत वा काल्पनिक. ते दृश्य सत्य मानून ज्याची तुम्ही कल्पना केलीत तशीच स्थिती शरीरामध्ये ते निर्माण करतं.

    आपल्या विचारानुसार आपली शारीरिक अवस्था तर बदलतेच त्याच बरोबर विचारांवर आधारित असलेल्या सर्व गोष्टी जीवनात प्रगट होवू लागतात. आजारपणाच्या बाबतीत कधी कधी सकारात्मक विचारांनी एखाद्याला जीवनदान मिळू शकतं तर तेच विचार नकारात्मक विचारांत परिवर्तीत झाले तर कुणाचा मृत्यू सुद्धा होवू शकतो. विचारांद्वारे आयुष्यात मनपसंत गोष्टीही मिळू शकतात. केवळ योग्य समज, सकारात्मक दृष्टीकोन, आशावादी विचार आणि शुद्ध भावना आवश्यक आहे.

   प्रथम कोणतीही गोष्ट आपण नवीन शिकतो तेव्हा तिचा पहिला संदर्भ हा जागृत मनाशी येतो. दररोज घडणाऱ्या घडामोडी ,तर्क संबंधित सगळ्या गोष्टी ,या मनाचा परीक्षेत्राच्या कक्षेत येतात. म्हणजे दैनंदिन तर्क,व्यवहार, नियम, व छोट्यामोठ्या गोष्टीं ज्या सर्व  आपण करत असतो. जागृत मना संबंधित गोष्टी ह्या फक्त वरवरच्या असतात. त्याने आपला संस्कार बनत नाही . आणि ती आपली ओळखही बनत नाही. अशा काही गोष्टी असतात की ज्या मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या संस्काराचा भाग बनवणे त्या पद्धतीने आपले जीवन मार्गक्रमित करण्यासाठी आपल्याला त्या जाणिवेच्या स्तरावरील गोष्टी अर्ध जागृत मनाच्या खोलीत उतरवाव्या लागतात, त्यातूनच मग आपला संस्कार बनतो, व्यक्तिमत्व घडते.. ह्या साठी जागृत मनाचा स्तरावरील गोष्टी अर्ध जागृत मनाकडे विशिष्ट पद्धतीने पाठवाव्या लागतात.
   मग असे काही प्रकार आहेत की ज्याद्वारे जाणीवपूर्वक काही नवीन संस्कार बनवता येतात. काही नवीन शिकता येतं ,की ज्याद्वारे आपल्याला अपेक्षित सर्वोच्च असं आपलं व्यक्तिमत्त्व घडवता येते. मग त्यासाठी
जागृत मनाचा कक्षेत येणाऱ्या गोष्टी पुढे अर्ध जागृत मनाचा खोलीत एका विशिष्ट पद्धतीने पाठवाव्या लागतात मग त्या अर्ध जागृत मनात जातात आणि मग त्यातून आपल्याला अपेक्षित असा संस्कार बनतो.आपलं व्यक्तिमत्त्व बनतं.

वरील विवेचनातून आपण अर्ध जागृत मनाचा वापर करून आपले जीवन समृद्ध  करू शकतो , तसेच जग कल्याण सुद्धा करू शकू . त्यासाठी आपल्याला अर्ध जागृत मनाचा वापर करण्याची पद्धत चारणे माहित होणे आवश्यक आहे . पुढील भागात त्या बद्धल आपण बघू .

अर्धजागृत मन उपयोगात आणण्यासाठीची आठ चरणे

पहिला चरण

संकल्प करा --जगकल्याणासाठी, देशासाठी, परिवारासाठी संकल्प करणे आवश्यक आहे .

दुसरा चरण

ध्येय निश्चित करा - भौतिक , मानसिक , अध्यात्मिक व सामाजिक या चारी पैलूंचे संतुलन असलेले ध्येय निश्चित करणे. ध्येयाची तीव्र इच्छा आवश्यक आहे. Burning desire  असावे.

तिसरा चरण

मान्यतांचा विकास करा . ध्येयाच्या विरुद्ध मान्यता किंवा ग्रह असेल तर ध्येय सिद्ध होत नाही . " काहीही होऊ दे मी ध्येय गाठणाराच " हा विचार महत्वाचा.

चौथा चरण

भावनेची जोड धयेयाशी निगडित करा . ध्येयाला जोडणार्या सर्व बाबींवर भावुक होणे जरुरीची आहे . 

पाचवा चरण  

अल्फा अवस्थेत  ध्येयाचे  मनोचित्रण करा . शांत अवस्थेत चालते फिरते रंंगीबरंगी मनोचित्र पाहण्याचा प्रयत्न करा .

सहावा चरण 

स्वयं सूचना देणे . वारंवार ध्येय साध्य होणार यावर विचार करणे. स्वतः ला सूचना द्या " मला हवे ते मी मिळवणारच ."

सातवा चरण

उध्दिपकांचा ध्येय प्राप्तीसाठी वापर करा. मौन, उपवास, अल्फा स्थिती, प्रार्थना, सकारात्मक विचार, ध्यान व अल्फा म्युजिक  ऐकणे हे उध्दिपकांचे प्रकार आहेत या सर्वांचा वारंवार उपयोग केल्यास ध्येय प्राप्तीचा मार्ग सुकर होईल.

आठवा चरण 

धीराने परिणामासाठी वाट बघणे. योग्य बी पेरले असेल व मनोचित्रणाद्वारे सिंचन केल्यावर ध्येय हमखास गाठले जाणारच.


अंतःकरण शुद्धी महत्त्वाची आहे. सर्वांबद्दल प्रेम, दया व क्षमा असणे जरुरीचे आहे.

वरील सर्व गोष्टींचा वापर करून अर्धजागृत मनाच्या साह्याने जगातील फक्त ४% लोक जगमान्यता पावले व त्यांनी लोककल्याणाचे काम केले.

उदा. संत ज्ञानेश्वर, विवेकानंद, मदर तेरेसा, व अलीकडच्या काळातील अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन इत्यादी.

या संबंधी you tube चे पुढील विडिओ  पहा .

Youtube link :  https://youtu.be/olL3jRaj9LA  part 1

             https://youtu.be/zbzHbF8_Vq0  part 2





 

Comments

Popular posts from this blog

ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत

Real concept of flow of Electrons in Conductor

Profile Of Blogger Prof Chandrakant Kali