इकिगाई ( IKIGAI )- आपल्याला निरोगी, आनंदी व दीर्घायुषी जीवन जगायचे असेल तर जाणून घ्या, जपानी रहस्य
इकिगाई ( IKIGAI ) - आपल्याला निरोगी, आनंदी व दीर्घायुषी जीवन जगायचे असेल तर जाणून घ्या, जपानी रहस्य मी या पृथ्वीतलावर का बरे आलो असेल? माझा जगण्याच्या नक्की उद्धेश काय आहे? असा प्रश्न तुम्ही कधी स्वत:ला विचारला आहे का? नाही ना? तर आता विचारा! रोजच्या कंटाळवाण्या दिनचर्याला वैतागून कितीतरी वेळा आपण असा विचार करतो कि, दूर एकांतात कुठेतरी निघून जावे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन जीवनाचा आनंद घ्यावा. पण हा आनंद व निरोगी जीवन आपण एकांतात न जाता, जगू शकतो का? त्याचे उत्तर - होय असे आहे. एका जपानी सूत्राने नक्कीच आनंद व निरोगी जीवन जगू शकतो.ते सूत्र आहे " इकिगाई " इकीगाई (IKIGAI ) म्हणजेच निरोगी, अर्थपूर्ण, आनंदी आणि दर्जेदार जीवनाचा मूलमंत्र. इकीगाई या जपानी शब्दाचा मूळ अर्थ आहे " स्वत:च्या अस्तित्वामागील कारण ". एका जपानी स्त्रीला तिचा इकिगाई कसा मिळाला हे समजण्यासाठी तिच्या जीवनात घडलेल्या एक घटना पाहू . ती स्त्री महापौरांची पत्नी होती. एकदा ती कोमात गेल...