ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDCeIA5FZH8r4FFIl7kn9atRr4Tqj78c6cr_rXZdaDFibtn98dB-fLA1tBczfdiNog1bYuq0D7wHpV2Ep6s5YHMS2hhjsOOraM8WKQPUWjB-8cnvROHY5yuoGls3gcSUULmAlG6xf8wYz-ZXvOPL_sNFKPzJ2NwhOHismXZ6K473YOGEWvfwZmrzF4Z-wi/s320/Study.png)
ऊर्जेच्या नियमाच्या आधारे अभ्यास करण्याच्या पद्धती व वाचलेले लक्षात ठेवण्याची रीत मेंदूचा वापर: साधारण मेंदूच्या क्षमतेच्या २ % वापर होतो . नोबेल मिळविणाऱ्या शास्त्रज्ञ २० - २५ % मेंदूच्या क्षमतेचा वापर करतात . लिओनार्डो विंची यांनी साधारण ६० - ६५ % मेंदूच्या क्षमतेचा वापर केला आहे . डावा व उजवा मेंदू: मेंदूचे दोन भाग असतात. एक डावा आणि दुसरा उजवा. मेंदूचा डावा भाग हा उजव्या शरीराचे नियंत्रण करतो आणि मेंदूचा उजवा भाग हा डाव्या शरीराचे नियंत्रण करतो . जेव्हा डावी नाकपुडी सक्रिय असते तेव्हा उजवा मेंदू सक्रिय असतो आणि उलट. उजवा मेंदू म्हणजे संगीत(Musical). डावा मेंदू तार्किक(Logical) आहे. मेंदूच्या डाव्या भागात भाषा , विचार , गणित , तर्क यांची केंद्रे आहेत . धोरण ठरवण्याचं काम डाव्या मेंदूचे . हा वस्तुनिष्ठ विचार , एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन विचार करतो . विज्ञानाचे काम या क्षेत्राकडे सोपवलेले आहे . ...